तुळजापुर दि १६ वार्ताहर तुळजापुर पञकार संघ व इंडियन जर्नालिस्ट असोशिएशनच्यावतीने राष्टीय पञकार दिन तुळजापुरात साजरा करण्यात अाला मोठया संख्येने पञकार यावेळी उपस्थात होते.
पञकार सरक्षण कायदा तातडीने लागु करावा, पञकार अधिस्वाकृती बाबत शासनाने धोरण नवीन अाणावे, पञकारांना अारोग्य सवलती मिळाव्यात या विषयी चर्चा करण्यात अाली तसेच श्री तुळजाभवानी पञकारिता पुरस्कार व कै.क.भ. प्रयाग पञकारिता पुरस्कार ६ जानेवारीस सौहळा घेण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.
यावेळी पञकार डाॅ. सतीश महामुनी यांनी हिंदी व इंग्रजी पञकारिता अाणि राष्टीय पञकारिता या विषयी मार्गदर्शन केले. पञकार श्रीकांत कदम, सचिन ताकमोघे, अनिल अागलावे, शुभम क़दम यांनी मनोगत व्यक्त केले.य़ाप्रसंगी पञकार ज्ञानेश्वर गवळी,कुमार नाईकवाडी, गणेश गायकवाड, अजित चंदनशिवे, रूपेश डोलारे, राहुलक़ोळी, सोमनाथ बनसोडे, ज्ञानेश्वर वाघरे,बाबा शेख, अक्षय डोलारे यांची उपस्थिती होती।
रिपोर्ट-शेराज अहमद कुरैशी
0 Comments